जळगाव : जिल्ह्यातील पारोळा शहरात सकाळी भिंत आणि छत कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले आहेत, यात एक महिला, एक पुरूष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
गाढ झोपेत असतांना अंगावर भिंत कोसळल्याने आई-वडिलांसह दोन शाळकरी मुलांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे.
या घटनेविषयी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पारोळा शहरातील राम चौक भागातील भोई गल्लीत राहणाऱ्या भगवान भिकाजी मेथे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासह त्यांचा अकरा आणि सात वर्षाच्या मुलाचा यात मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.