नेरळ : थंड हवेच ठिकाण असणारे माथेरान आजपासून बेमुदत बंद राहणार आहे.
माथेरानमध्ये 2003 ला इको सेन्सेटिव्ह झोन लागू करण्यात आल्याने नव्याने बांधकाम करण्यावर निर्बंध आली आहेत. त्यातच माथेरानचा विकास आराखडा शासन दरबारी प्रलंबित आहे... आणि याच दरम्यान माथेरानच्या नागरिकांनी आपल्या घरांची बांधकामे केलीत.
'बॉम्बे एन्व्हायरमेंट अॅक्शन ग्रुप' या सामाजिक संस्थेने अलीकडे एनजीटीकडे माथेरानच्या नागरिकांनी जी बांधकामे केली होती त्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि एनजीटीनं 2003 नंतर केलेली सर्व बांधकामे पाडण्याचा निर्णय दिलाय.
आज पोलीस बंदोबस्तात बांधकामे पाडण्याचे काम सुरु होणार आहे त्या विरोधात माथेरान संघर्ष समितीकडून माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माथेरान गावकऱ्यांनी घेतला आहे.