गोंदियात हॉटेलला आग, आगीत ७ जणांचा मृत्यू

शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हाँटेलला भीषण आग लागली आहे.  याआगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग पूर्ण पणे विझलेली नाही.

Updated: Dec 21, 2016, 11:57 AM IST
गोंदियात हॉटेलला आग, आगीत ७ जणांचा मृत्यू title=

गोंदिया : शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हाँटेलला भीषण आग लागली आहे.  याआगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग पूर्ण पणे विझलेली नाही.

 आग लागली त्यावेळी हॉटेलमध्ये दहा ते पंधरा जण होते अशी माहिती हॉटेलच्या मालकांनी दिलीय. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आगीत हॉटेलचे  चार मजले जळून खाक झाले आहेत. तब्ब्ल चार तासानंतर हॉटेलबाहेरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे.

अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे.