कोल्हापूर : कम्युनिष्ट नेते आणि थोर विचारवंत गोविंद पानसरे आणी त्यांच्या पत्नीवर अज्ञात दोघा हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळी हे दाम्पत्य फिरायला गेले होते. त्यानंतर दोघे हॉटेलमध्ये नास्ता करण्यास गेले होते. ते हॉटेलमधून बाहेर पडताना दोघांवरही अकस्मात गोळीबार करण्यात आला. आपल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीमधे आली. त्यावेळी हल्लेखारांनी त्यांच्यावरही गोळ्या झाडल्या.
त्यांच्या मानेत गोळ्या पाच घुसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया सुरु आहे. या हल्ल्याचा विचारवंत कुमार सप्तर्षी आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या हल्याचा निषेध केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.