92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास : संजय काकडे

महापालिका निवडणुकीत 92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर घोषणा खासदार संजय काकडे यांनी शहरातील वाडेश्वर कट्ट्यावर केली. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 22, 2017, 01:30 PM IST
92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास : संजय काकडे title=

पुणे : महापालिका निवडणुकीत 92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर घोषणा खासदार संजय काकडे यांनी शहरातील वाडेश्वर कट्ट्यावर केली. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोप-प्रत्यारोपानंतर पुण्यातल्या वाडेश्वर कट्टयावर राजकीय मैफल रंगली. भाजपला 92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा काकडे यांनी करताना भाजपलाच विजय मिळेस, असा दावा केलाय आहे.

निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोप मतदानानंतर शमले असले तरी दावे प्रतिदावे सुरुच आहेत. असं असलं तरी राजकीय पक्षांची नेतेमंडळी आज जरा रिलॅक्स आहे. श्रमपरिहाराच्या निमित्ताने पुण्यातील वाडेश्वर कट्टयावर पुणेरी मिसळीचा आश्वाद घेतला. यावेळी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केलेलं जे विधान केलं ते जरा धक्कादायकच आहे.