विक्रमी वेळेत नागपुरात उड्डाणपूल पाडला

छत्रपती उड्डाणपूल पाडण्याचं काम पूर्ण झालं असून येत्या दोन ते तीन दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी निश्चित करण्यात आला होता. मात्र आठ दिवसांतच हा पूल पाडण्यात आलाय. 

Updated: Nov 23, 2016, 06:22 PM IST
विक्रमी वेळेत नागपुरात उड्डाणपूल पाडला title=

नागपूर : छत्रपती उड्डाणपूल पाडण्याचं काम पूर्ण झालं असून येत्या दोन ते तीन दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी निश्चित करण्यात आला होता. मात्र आठ दिवसांतच हा पूल पाडण्यात आलाय. 

गेल्या 15 वर्षांपासून नागपूरच्या छत्रपती चौकात उभा असलेला उड्डाणपूल आता दिसणार नाही. नागपूर मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरत असल्याने हा पूल तोडण्यात आला. 15 नोव्हेंबरला पूल तोडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यासाठी या परिसरातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली होती. 

15 दिवसांत काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन होतं. मात्र हा पूल आठ दिवसांतच पाडण्यात आलाय. येत्या 2 ते 3 दिवसांत मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. 

जुन्या पुलाची आठवण म्हणून पाचपैकी दोन पुलाचे पिलर तसेच ठेवण्यात आलेत. नवा पूल बांधल्यावरही हे पिलर तसेच ठेवण्यात येणार आहेत. मात्र ज्या उत्साहाने आणि तत्परतेने हा पूल पाडला. तेवढ्याच तत्परतेने मेट्रोचं काम पूर्ण करून मेट्रो सुरू करावी अशी मागणी नागपूरकरांनी केलीय.