शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ते केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.  

Updated: May 9, 2015, 10:27 AM IST
शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार title=

दापोली, रत्नागिरी : जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.  

 रा. वि. तथा बाबुराव बेलोसे चरित्रग्रंथ प्रकाशन, हिराताई बेलोसे महिला वसतीगृह इमारत, मध्यवर्ती ग्रंथालय इमारात, इंदूमती लक्ष्मणराव यादव विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय इमारत, शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय इमारत, संजय बेलोसे कला अकादमीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आज ना उद्या शिवसेना जैतापूर या मुद्यावरुन सत्ता सोडेल असा विश्वास असल्याचंही शरद पवार म्हणाले. 

प्रकल्पग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेवून जैतापूर प्रकल्प झाला पाहिजे, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन काळजी घेवून हा प्रकल्प व्हावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 

देशातील सर्वच भागातील शेतकरी आज अडचणीत आहेत. आपला देश व आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने भविष्यकाळात शेतकऱयाला जगविण्याकरीता शेती विमा धोरणात अमुलाग्र बदल आवश्यक असल्याचे महत्वपूर्ण मत पवार यांनी व्यक्त केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.