जळगाव विमानतळावर खडसेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यक्रमाला मात्र दांडी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव विमातळावर जाऊन भेट घेतली.

Updated: Oct 16, 2016, 04:07 PM IST
जळगाव विमानतळावर खडसेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यक्रमाला मात्र दांडी title=

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव विमातळावर जाऊन भेट घेतली. यावेळी खडसे समर्थक खासदार ए. टी. पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे हेही खडसेंसोबत विमानतळावर उपस्थित होते.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या जामनेरमधल्या कार्यक्रमाकडे एकनाथ खडसेंनी पाठ फिरवली. शनिवारी जळगावमध्ये झालेल्या जिल्हा भाजप पदाधिका-यांच्या बैठकीत, खडसे आणि महाजन समर्थक आमनेसामने आले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत खडसेंचं नाव खाली लिहिलं गेल्यामुळे, चिडलेल्या खडसे समर्थकांनी ती बैठक उधळून लावली होती.