सेनेला टोला ; केंद्र, राज्याच्या मदतीशिवाय नाशिकचा विकास : राज ठाकरे

 नाशिक दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाबाबत महापालिकेकडून होणा-या कामांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. नाशिकचा विकास महापालिका करत असून, राज्य आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच ज्यांच्या हाती वर्षोनुवर्षे सत्ता आहे त्यांनी केलेली कामं आणि मी साडेतीन वर्षांत केलेलं काम बघा, असं सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही टोला लगावला.

Updated: Jul 11, 2015, 10:33 PM IST
सेनेला टोला ; केंद्र, राज्याच्या मदतीशिवाय नाशिकचा विकास : राज ठाकरे title=

नाशिक : नाशिक दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाबाबत महापालिकेकडून होणा-या कामांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. नाशिकचा विकास महापालिका करत असून, राज्य आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच ज्यांच्या हाती वर्षोनुवर्षे सत्ता आहे त्यांनी केलेली कामं आणि मी साडेतीन वर्षांत केलेलं काम बघा, असं सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही टोला लगावला.

 मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकरला डिवचलंय. नाशिक शहरात जी काम सुरु आहेत ती महानगर पालिकेच्या माध्यमातून सुरु आहेत. राज्य किवा केंद्र सरकारकराचा ज्याप्रमाणे निधी मिळायला पाहिजे होता  त्याप्रमाणे मिळाला नसल्याचा आरोप राज यांनी केलाय.

राज्य सरकार कुंभमेळ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय. शहरात साडेचारशे कोटी रुपयांची रस्त्याची काम, नवीन पूल उभे राहिले आहेत. मात्र, यासाठी कोणीही मदत केली नाही. पालिकेच्या तिजोरीच्या माध्यमातून झाली आहेत. केंद्रातील तसेच राज्यातील सरकारने काहीही मदत केली नाही, असे राज यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी राज यांनी शिवसेनाला सुनावलं. ज्यांच्याकडे अनेक वर्षे सत्ता आहे. त्यांनी काय केलंय शहराचे ते आपण पाहिलं असेल. मी साडेतीव वर्षांत करुन दाखवलं, ते अनेक वर्षांत का झालं नाही, असा सवाल उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.