'हिरव्या विषा'चा पर्दाफाश, डोंबिवलीत ठेकेदारविरोधात गुन्हा

डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी  विषारी भाज्यांचं शेत उधळलं. डोंबिवली पोलिसांत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. झी मीडियानं मुंबईतल्या 'हिरव्या विषा'चा पर्दाफाश केलाय.

Updated: Jul 11, 2015, 05:29 PM IST
'हिरव्या विषा'चा पर्दाफाश, डोंबिवलीत ठेकेदारविरोधात गुन्हा title=

ठाणे : डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी  विषारी भाज्यांचं शेत उधळलं. डोंबिवली पोलिसांत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. झी मीडियानं मुंबईतल्या 'हिरव्या विषा'चा पर्दाफाश केलाय.

हिरव्या विषाची म्हणजेच विषारी भाज्यांची बातमी झी २४ तासनं दाखवल्यानंतर आता प्रशासनाला जाग आलीय. ही बातमी पाहून डोंबिवलीतील मनसेन कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल भाज्यांचं शेत उधळून लावत रेल्वे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडलं.

डोंबिवलीतल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन ही शेती करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारला. मनसे नगरसेवक मनोज घरत, डोंबिवली प्रमुख राजेश कदम, विभाग अध्यक्ष राजेश कदम, डोबविली विद्यार्थी मनसे प्रमुख समीर पालांडे यांनी घटनास्थळावर जाऊन त्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावेळी १५-२० एकरमध्ये नाल्याचं पाणी वापरुन भाजी पिकविण्यात येत असल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं. ही भाजी बदलापूरपासून मुंबईतील अनेक मोठ्या रहिवाशी भागात विकली जाते.

हा ठेकेदार रेल्वे अधिकाऱ्याला दरमहा आठ हजार रुपये देत असल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आलीय. तसंच या शेतीमधून रेल्वे प्रशासनाला १ ते २ लाख रुपये दिले जात असल्याचंही यावेळी समोर आलंय. या प्रकरणी ठेकेदाराविरोधात डोंबिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.