नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केलंय. यावेळी आक्रमक आंदोलकांनी थेट बॅरिकेड्स तोडत विधान भवनावर कूच केलीय. त्यामुळं पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
युवक काँग्रेसच्या धिक्कार मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झालेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्त्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चावर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा आवारातील बॅरिकेडस तोडून विधानसभेकडे पुढे सरकले. यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जोरदार लाठीमार केला.
युवक काँग्रेसने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी सरकारने मोठे पॅकेज मंजूर तात्काळ मदत करावी, या मागणीसाठी धिक्कार मोर्चा काढला होता.
दरम्यान, लोकशाही मार्गाने काढलेल्या युवक काँग्रेसच्या मोर्चावर पोलिसांना लाठीमार करायला भाग पाडून भाजप सरकारने आपल्या ताकदीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विश्वजित कदम यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.