पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तानाजी नगरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.
रविवारी रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आदित्य सुनील पिसाळ असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. घरात टेबलवर उभा राहून त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अल्पवयीन मुलाने गळफास घेतल्याने अनेकांना धक्का बसलाय. पोलीस आत्महत्या आहे की घातपात, याची चौकशी करीत आहेत. दरम्यान, आज सकाळी संबंधित मुलांवर धनकवडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.