नागपूर : जिल्ह्यातील कन्हान भागातील कुख्यात गुंड शीतल सिंह उर्फ मिठ्ठूचा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर खून करण्यात आलाय.
'कोळसा माफिया' अशी ओळख असलेल्या शीतल सिंहच्या विरोधात खंडणी, मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांची सिंहविरोधात नोंद होती. आपल्या गुंड प्रवृत्तीमुळे त्यानं स्वत:चे अनेक शत्रू तयार केले होते. यापैंकीच एक असलेल्या शरद आणि सुरज गोमेकर या दोन भावांनी त्याचा खात्मा केलाय.
कन्हानमधील रहिवासी असलेले गोमेकर बंधू एक स्थानिक क्लब चालवायचे... शुक्रवारी रात्री मिठ्ठूने तिथं जात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला समाज दिल्यावरही तो गोंधळ घालण्यापासून परावृत्त झाला नाही आणि त्यातून झालेल्या वादातून गोमेकर बंधूनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
गंभीर जखमी झालेल्या मिठ्ठूला रुग्णालयात हलवत असतानाच.... मिठ्ठू अजूनही जिवंत असल्याचं पाहून शरद आणि सुरजनं कारच्या काचा फोडत त्याच्यावर पुन्हा एकदा गोळ्या झाडल्या... यात मिठ्ठूचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारात मिठ्ठूचा भाऊही जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
कन्हानमध्ये एकाच ठिकाणी दोनदा गोळीबाराचा प्रकार उघडपणे झाल्याने नागपूर ग्रामीणमध्ये सुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचं उघड होतंय. दरम्यान, कन्हान पोलिसांनी दोन्हीही आरोपींना अटक केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.