सावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड

शहरात सावकाराच्या घरावर, सहकार विभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली.

Updated: Aug 23, 2016, 10:19 PM IST
सावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड title=

उस्मानाबाद : शहरात सावकाराच्या घरावर, सहकार विभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून ही धाड टाकण्यात आली.

उस्मानाबाद शहरातील कुप्तसिद्ध सावकार दत्ता बाळासाहेब देवकतेच्या घरावर छापा टाकला त्यावेळी जमिनीची कागदपत्रे, कोरे बॉण्ड, चेक सापडले आहे. त्याच्या संपत्ती ची मोजदाद सुरु आहे. विशेष म्हणजे सावकार देवकते हा एका खासगी शाळेत शिक्षक आहे.

देवकते याच्यावर यापूर्वी अवैध सावकारीचा गुन्हा ही दाखल आहे. पीडित सहा जणांच्या तक्रारीनंतर जाग्या झालेल्या सहकार विभागाने आज छापा मारला. सहायक निबंधक एम एल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी सावकार दत्तात्रय देवकते याने अधिकाऱ्यांशी अरेरावी केली.