पुणे : छत्रपतींचा पुतळा समुद्रात उभा करण्याच्या कल्पनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केलीय. महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन न करता, नुसते पुतळे उभे करण्याला काहीच अर्थ नसल्याची टीका त्यांनी पुण्यात केली.
पुण्यातील सिंहगड काँलेज आँफ आर्किटेक्चर आणि काशीबाई नवले काँलेज आँफ आर्किटेक्चरच्यावतीनं आयोजीत 'दृश्य किपिंग इट अलाईव्ह' या वस्तू संवर्धन प्रदर्शनाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
छत्रपतींचा पुतळा समुद्रात उभा करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली? तोही स्टँच्यू आँफ लिबर्टी पेक्षा मोठा? आणि तो बनविण्यासाठी शिल्पकार कोण, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.