नराधम बाप... 2 मुलींची विहिरीत बु़डवून केली हत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी इथं एका शिवारात पित्यानं २ मुलींची विहिरीत बुडवून हत्या केल्याचं उघड झालंय. 

Updated: Apr 22, 2015, 01:31 PM IST
नराधम बाप... 2 मुलींची विहिरीत बु़डवून केली हत्या title=

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी इथं एका शिवारात पित्यानं २ मुलींची विहिरीत बुडवून हत्या केल्याचं उघड झालंय. 
 

जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील पारडी या गावी तामदेव आणि अलका झरकर आपल्या २ मुलींसह वास्तव्याला होते. रविवारी तामदेव आपल्या २ मुलींना घेऊन एका धार्मिक प्रवचनाला जातो असं सांगून घरून रवाना झाला. मात्र घरी एकटाच परतला. मुली हरविल्या अशी बतावणी त्यानं केली. 

दरम्यान आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला. यात पित्यावरच संशय बळावल्यानं पोलिसांनी कसून चौकशी करताच हा प्रकार पुढे आला. भावना वय अकरा वर्ष आणि जागृती नऊ वर्ष अशी मृत मुलींची नावं आहेत. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून या हत्येमागचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.