ठाणे : आता ठाणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी... दूध विक्रेत्यांना छापील किंमतीवर कंपन्याकडून जोपर्यंत १० टक्के कमिशन दिले जात नाही, तोपर्यंत दूध विक्रीच बेमुदत बंद करण्याचा निर्धार ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने केलाय.
ठाणे-मुंबईत तब्बल १० हजाराच्या आसपास दूध विक्रेते असून एकट्या ठाण्यातच १२०० किरकोळ दूध विक्रेते आहेत. नामांकित म्हणवणाऱ्या गोकूळ, मदर, वारणा, अमूल आणि महानंद या कंपन्या अवघे एक ते दीड टक्केच कमिशन दूध विक्रेत्यांना देतात.
याविरोधात दूध विक्रेत्यांनी २००३ पासून अनेकदा आंदोलने छेडली. सरकार दरबारीही समस्या मांडली. तरीही न्याय मिळत नसल्याने दूध संघटनेने आजपासून संबंधित कंपन्यांचे दूधच विकणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
पण, ग्राहकांची आबाळ होवू नये यासाठी पर्यायी दूध विक्री करणार असल्याचं संघटनेने म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.