सत्तेत असतांना किती धरणं बांधली? विखे पाटलांचा पवारांना सवाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलंय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणाऱ्या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणं बांधली? असा सवाल करत मोर्चे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, असं आवाहन केलंय. सहकार क्षेत्रावरुनही पवारांना टोला लगावला. 

Updated: Sep 13, 2015, 11:19 PM IST
सत्तेत असतांना किती धरणं बांधली? विखे पाटलांचा पवारांना सवाल title=

अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलंय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणाऱ्या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणं बांधली? असा सवाल करत मोर्चे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, असं आवाहन केलंय. सहकार क्षेत्रावरुनही पवारांना टोला लगावला. 

अधिक वाचा - राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका

दुष्काळाच्या मुद्द्यावर बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार या दोन दिग्गजांमधले आरोप-प्रत्यारोप अजूनही संपण्याचं नावं घेत नाही. पाणी परिषदेनं सूचवलेल्या योजना सरकारनं अमलात आणल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका बाळासाहेब विखे पाटलांनी केलीय.  

अधिक वाचा - दुष्काळाला शरद पवारच जबाबदार : काँग्रेस

तसंच सत्ता गेल्यावर शरद पवार पाणी प्रश्नावर तरुणांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही विखे पाटलांनी पवारांवर केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.