कराड येथील भीषण अपघातात ५ जण ठार ८ जखमी

बेलवडे येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार तर ८ जखमी झालेत. हा अपघात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-पुणे मार्गावर झाला. साईबाबांच्या दर्शनासासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

Updated: Dec 6, 2014, 08:20 AM IST
कराड येथील भीषण अपघातात ५ जण ठार ८ जखमी title=

सातारा : बेलवडे येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार तर ८ जखमी झालेत. हा अपघात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-पुणे मार्गावर झाला. साईबाबांच्या दर्शनासासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

खासगी बसला दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ प्रवासी ठार झाले असून ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इचलकरंजीचे भाविक उत्तर काशीहून शिर्डीला जात होते. सकाळी पाच वाजता कराडजवळच्या बेलवडे गावाजवळ भाविकांची बस उभी करण्यात आली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या टेम्पोने बसला जोरदार धडक दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.