भाजपमध्ये 40 'आयाराम' उमेदवार

भाजपने 40 आयारामांना उमेदवारी दिल्याने, वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहे. भाजपनेच नव्हे तर अनेक पक्षांनी हा फंडा आजमवलाय. पण भाजपमध्ये यावेळी आयारामांची संख्या 40 असल्याने भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

Updated: Oct 1, 2014, 04:32 PM IST
भाजपमध्ये 40 'आयाराम' उमेदवार title=

मुंबई : भाजपने 40 आयारामांना उमेदवारी दिल्याने, वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहे. भाजपनेच नव्हे तर अनेक पक्षांनी हा फंडा आजमवलाय. पण भाजपमध्ये यावेळी आयारामांची संख्या 40 असल्याने भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर भाजपने आयारामांना यादीत स्थान दिल्याचं सांगण्यात येत आहे. स्वबळाचा दावा सिद्ध करण्यासाठी भाजपने हा उपाय केला असल्याचं सांगितलं असलं, तरी हा उपाय महागात पडतो का?, हे 19 तारखेला दिसून येणार आहे.

भाजपमध्ये आलेल्या 40 आयारामांमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या पक्षातील नाराजांचा समावेश आहे. भाजपची लाट आहे आणि आपल्याला लॉटरी लागेल, म्हणून आयारामही उड्या मारत भाजपात दाखल झाले आहेत. 

भाजपने 26 जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत आणि 262 उमेदवार उभे केले आहेत.

भाजपमध्ये ऐनवेळी दाखल झालेले आयाराम (36 उमेदवारांची नावं उपलब्ध झाली आहेत.)
1) विजयकुमार गावीत, 
2) अनिल गोटे, 
3) संजय सावकारे,
4) जगदीश वळवी
5) पी. सी. आबा पाटील, 
6) राजेंद्र पटणी, 
7) सुनील देशमुख, 
8) डॉ. अनिल बोंडे, 
9) आशीष देशमुख, 
10) संजय देवतळे, 
11) डॉ. माधव किन्हाळकर, 
12) किशनचंद तनवाणी,
13) प्रशांत बंब, 
14) अद्वैत हिरे, 
15) माणिकराव कोकाटे, 
16) सीमा हिरे, 
17) किसन कथोरे, 
18) रमेश पाटील, 
19) वैभव नाईक, 
20) मंदा म्हात्रे, 
21) डॉ. भारती लव्हेकर, 
22) राम कदम, 
23) विजय कांबळे, 
24) शरद ढमाले, 
25) राजेंद्र पिपाडा, 
26) स्नेहलता कोल्हे, 
27) संजय क्षीरसागर, 
28) श्रीकांत देशमुख, 
29) अतुल भोसले,  
30) अमल महाडिक, 
31) राजन तेली, 
32) शिवाजीराव नाईक, 
33) पृथ्वीराज देशमुख, 
34) गोपीचंद पडाळकर, 
35) अजित घोरपडे, 
36) विलासराव जगताप

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.