हनीच्या बायकोलाही उटपटांग गाण्यांचा तिरस्कार...

रॅपर यो यो हनी सिंहची गाणी तुम्हाला पसंत नसतील तर स्वत:ला जुन्या वळणाचे म्हणवून घेण्याची काहीही गरज नाही... कारण, हनीची गाणी आवडत नसलेले तुम्ही एकमेव नाही तर यांमध्ये हनीच्या पत्नीचाही समावेश आहे.

Updated: Jul 9, 2014, 08:52 AM IST
हनीच्या बायकोलाही उटपटांग गाण्यांचा तिरस्कार...  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : रॅपर यो यो हनी सिंहची गाणी तुम्हाला पसंत नसतील तर स्वत:ला जुन्या वळणाचे म्हणवून घेण्याची काहीही गरज नाही... कारण, हनीची गाणी आवडत नसलेले तुम्ही एकमेव नाही तर यांमध्ये हनीच्या पत्नीचाही समावेश आहे.

प्रसिद्ध रॅपर आणि अनेक वादग्रस्त गाण्यांमुळे सतत चर्चेत असणारा गायक यो यो हनी सिंग विवाहित आहे, हे फारच कमी जणांना माहित आहे... सुरुवातीला त्यानं आपण विवाहित असल्याच्या वृत्ताला नकार दिला होता. पण, नंतर त्याला हे मान्य करावंच लागलं... पण, यावेळी त्यानं आपल्या दोघांच्या आवडी-निवडीविषयी धम्माल माहिती उघड केलीय. 

एका वर्तमानपत्राशी बोलताना, हनीनं आपल्या पत्नीला आपले गाणे अजिबात पसंत नसल्याचं म्हटलंय.

‘तिला माझं कोणतंही गाणं आवडत नाही... मला तर वाटतं की ती माझ्या गाण्यांचा तिरस्कार करते... पण, फक्त बोलून दाखवत नाही इतकंच...’ असं हनीनं म्हटलंय. 
हनी म्हणतो, ‘तिला रोमांटिक गाणी जास्त आवडतात... आणि मी मात्र फारसे रोमांटिक गाणे गायलेलेच नाहीत... पण, एक गाणं आहे जे तिला दररोज ऐकायला आवडतं... ब्राऊऩ रंग गाणं तिला खूप आवडतं... आणि त्यामुळे ती मला दररोज हे गाणं गायला लावते...’

... आणि मग हनी हसत म्हणतो, आता तिच्यासाठी काहीतरी गायलाच लागेल ना!

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.