औरंगाबाद : शहराच्या प्रोझोन मॉलमध्ये 12 जण जखमी झाले आहेत. अभिनेता रितेश देशमुखला पाहाण्यासाठी शहराच्या प्रोझोन मॉलमध्ये तुडुंब गर्दी जमली होती.
रितेशला पाहाण्यासाठी गॅलरीत झालेल्या रेटारेटीतून तीन जण खाली पडले तर, सरकत्या जिन्याची पट्टी तुटून झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण जखमी झाले.
अनेक तरुणांचे कपडे फाटले तर, काहींचे महागडे मोबाईल आणि इतर वस्तू हरवल्या. सोमवारी रितेश त्याचा आगामी चित्रपट 'लय भारी'च्या प्रमोशनसाठी औरंगाबादमध्ये आला होता. यावेळी त्याला पाहाण्यासाठी प्रोझोन मॉलमध्ये तरुण-तरुणींची मोठी गर्दी झाली होती.
प्रोझोनचे तिन्ही जिने आणि फुटकोर्ट गर्दीने फुलून गेले होते. मात्र, रितेश आल्यानतंर त्याला एक नजर डोळा भरून पाहाण्यासीठी चाहत्यांनी रेटारेटी सुरु केली आणि गोंधळ उडाला.
यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी आणि बाऊंसर यांना देखील गर्दीला आवरणे कठीण झाले होते. गर्दीच्या तुलनेत पोलिसांची आणि सुरक्षा रक्षकांची संख्या अतिशय तोकडी होती. त्यामुळे गर्दीला आवरणे अवघड झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.