मुंबई : सलमान खानला 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा स्थगित करत हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. नेमका का मिळाला सलमानला जामीन... पाहुयात...
- या प्रकरणातला मुख्य साक्षीदार, सलमानचा बॉडीगार्ड आणि मयत माजी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील याच्या जबाबाची संपूर्ण प्रत कुठेय? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. थिपसे यांनी सरकारी पक्षाकडे केलीय.
- सलमानला जामीन मिळण्याबद्दल सरकारी पक्षाचा विरोध का आहे? अशीही विचारणा न्यायालयाने सरकारी वकिलांकडे केली... याचं उत्तर सरकारी वकिलांकडे नव्हतं.
- या प्रकरणात कलम ३०४-२ अगोदरच का लावण्यात आलं नाही? - न्यायमूर्ती ए एम थिपसे यांनी विचारला प्रश्न
- सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार अपघातावेळी जर गाडीत तीन जण होते... सलमान खान, रविंद्र पाटील आणि कमाल खान... मग, अशा वेळी प्रकरणातला आणखी एक मुख्य साक्षीदार म्हणून कमाल खानचा जबाब पोलिसांनी का नोंदवून घेतला नाही.
- कमाल खान सलमानचा सख्खा भाऊ नाही, त्यामुळे त्याचा जबाब नोंदवला जाणं आवश्यक होतं.
- सलमान खानच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, मुख्य साक्षीदार असलेल्या रविंद्र पाटीलनं दोन गोष्टी चुकीच्या सांगितल्या होत्या... या दोन गोष्टींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं.
- बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार, सलमान खान गुन्हेगार नाही आणि गेल्या १३ वर्षांपासून तो जामिनावर आहे या दरम्यान त्यानं कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा कोणत्याही साक्षीदाराला धमकावलेलं नाही.
- बचाव पक्षानुसार, हा खटला अजून कोर्टात सुरू आहे त्यामुळे सलमानला तुरुंगवास का दिला जाऊ शकतो?
- सलमानच्या वकिलांच्या म्हणण्यावर विचार करून न्यायमूर्ती थिपसे यांनी सलमानला जामीन मंजूर केला.
- सलमान खाननं जामीन मिळण्यासाठी सेशन कोर्टात जाऊन आत्मसमर्पण करावं आणि त्यानंतर जामीन मिळण्यासाठी बॉन्ड जामीन घ्यावा, असा आदेश यावेळी कोर्टानं दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.