'हॅपी एंडिंग'मध्ये सुपरस्टारच्या भूमिकेत गोविंदा!

Updated: Oct 10, 2014, 12:33 PM IST
'हॅपी एंडिंग'मध्ये सुपरस्टारच्या भूमिकेत गोविंदा! title=

मुंबईः 'हॅपी एंडिंग'मध्ये सैफ अली खानसोबत गोविंदा सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात  गोविंदा बॉलिवूडमधील सिंगल स्क्रीन सुपरस्टार अरमानची भूमिका करणार आहे.

फिल्ममध्ये सुपरस्टार अरमान त्याच्या सिनेमात हॉलिवूडला जाऊन बॉलिवूड स्क्रिप्ट हॉलिवूस्टाइलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात. हॅपी एंडिगचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. फर्स्ट लूकवरून फिल्म खूप मसालेदार आणि गोविंदा खूप रंगतदार दिसतोय.

रोमांटिक कॉमेडी सिनेमा सैफ अली खान आणि प्रोड्यूसर दिनेश विजन ही जोडी घेऊन येणार आहे. या जोडीने याआधी 'लव आज कल' आणि 'कॉकटेल' सारखे हिट सिनेमे दिले आहे. हा सिनेमा राज आणि डीके दिग्दर्शित करत आहे.

राज आणि डीके या डायरेक्टर जोडीने 'गो गोवा गॉन' हा पहिला सिनेमा डायरेक्ट केला आहे. या सिनेमात सैफसोबत प्रमुख भूमिकेत इलियाना डी क्रूज दिसेल. हा सिनेमा 21 नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.