व्हिडिओ : सलमान-ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडिओ वायरल

सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... एकाच दृश्यात... कल्पनेतही शक्य वाटत नाहीए ना... पण, असं घडलंय हे मात्र खरं... 

Updated: May 26, 2016, 09:41 PM IST
व्हिडिओ : सलमान-ऐश्वर्या-अभिषेकचा व्हिडिओ वायरल title=

मुंबई : सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... एकाच दृश्यात... कल्पनेतही शक्य वाटत नाहीए ना... पण, असं घडलंय हे मात्र खरं... 

२००० साली प्रदर्शित झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमामुळे हे शक्य झालंय. या सिनेमातल्या एका दृश्यात सलमान, अभि आणि अॅश तिघंही दिसले होते. 

हे शक्य झालं कारण हा काळ होता जेव्हा अभि बॉलिवूडमध्ये नवखा होता... आणि सलमान-ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. २००२ साली या दोघांचं नात संपुष्टात आलं...

पण, हे दृश्य काही प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे... हाच व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसतोय.