बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये

कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. 

Updated: May 26, 2016, 09:28 PM IST
बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये title=

कोलकता: कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. पण ही स्कूटर विकायला सुजीत नारायण तयार नाहीत. सुजीत यांची ही स्कूटर अमिताभ बच्चन यांच्या तीन चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वापरण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ स्कूटर चालवताना दाखवण्यात आले आहेत.

ही 20 वर्षांपूर्वीची स्कूटर आहे, मी ती 13 वर्ष आधी विकत घेतली होती, आजही मी ही स्कूटर वापरत आहे, अशी प्रतिक्रिया सुजीत यांनी दिली आहे. तीन चित्रपटाच्या शूटिंगवेळी माझी स्कूटर मागण्यात आली, तेव्हा मला आनंद झाला. मी ही स्कूटर कधीच विकणार नाही, असंही सुजीत म्हणाले आहेत. माझ्या घरामध्ये स्कूटरवरचा अमिताभ बच्चन यांचा फोटो लावणार असल्याची इच्छा सुजीत यांनी व्यक्त केली आहे.