व्हिडिओ : भर कार्यक्रमात रवीनावर अश्लील टिप्पणी

स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लॉस एंजेलिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित झाली होती. पण, इथं तिला छेडछाडीला सामोरं जावं लागल्याचा आरोप तिनं केला होता... आता, या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. 

Updated: Aug 19, 2015, 09:08 PM IST
व्हिडिओ : भर कार्यक्रमात रवीनावर अश्लील टिप्पणी title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लॉस एंजेलिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित झाली होती. पण, इथं तिला छेडछाडीला सामोरं जावं लागल्याचा आरोप तिनं केला होता... आता, या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. 

कार्यक्रमादरम्यान, माझ्या मागच्या बाजुला बसलेल्या एका व्यक्तीनं वैयक्तिक टीका-टिप्पणी सुरु केल्यावर मला खूप दु:ख झालं. मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती स्टेजवर चढला आणि त्यानं आक्षेपार्ह वर्तन सुरू केलं. 

रवीनाच्या म्हणण्यानुसार, नीरज अग्निहोत्री नावाच्या एका व्यक्तीनं तिच्यावर अश्लील टिप्पणी केली. तो ऑर्गनायझर्सपैंकी एक होता. तो माझ्यावर नाराज होता कारण त्याची मुलं माझ्यासोबत माझ्या गाडीत येऊ शकली नाही. सिक्युरिटी आणि प्रोटोकॉलमुळे हे शक्य नव्हतं. एखाद्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांना खुश ठेऊ शकत नाहीत.  

काय घडलं त्यावेळी नेमकं पाहा व्हिडिओतून...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.