व्हिडिओ ट्रेलर : 'वजीर'मध्ये अमिताभ - फरहान एकत्र!

अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, जॉन अब्राहम अशी तगडी स्टारकास्ट घेऊन विधु विनोद चोपडा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय.

Updated: Nov 18, 2015, 05:32 PM IST
व्हिडिओ ट्रेलर : 'वजीर'मध्ये अमिताभ - फरहान एकत्र! title=

मुंबई : अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, जॉन अब्राहम अशी तगडी स्टारकास्ट घेऊन विधु विनोद चोपडा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमाच्या माध्यमातून अमिताभ आणि फरहान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अदिती राव हैदरी हिचीही या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.  

सिनेमात अमिताभ काश्मिरी पंडिताच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर फरहान एटीएस (अॅऩ्टी टेररिस्ट स्कॉड़) अधिकाऱ्याची भूमिका निभावताना दिसतोय. 
 
या सिनेमाचं कथानक विधु विनोद चोप्रा आणि अभिजीत जोशी यांनी लिहिलंय. विधु विनोद चोप्रा हे या सिनेमाचे सहनिर्मातेही आहेत याशिवाय आकिब खान आणि राजकुमार हिरानी हेदेखील या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. 8 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.