मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ हा सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली.
‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणाऱ्या दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ चित्रपट आहे.
thrilled to announce that #XxX:TheReturnofXanderCage will release in India first!before anywhere else in the world! #14thJanuary #VinDiesel pic.twitter.com/8y36pMYQBF
— Deepika Padukone (@deepikapadukone) December 28, 2016
जगातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी १४ जानेवारीला हा चित्रपट भारतीय चित्रपट गृहात दाखल होईल. असे दीपिकाने म्हटले आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट इतर देशात प्रदर्शित होईल.
पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दीपिकाने सेरेना नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.