मुंबई : एका मॉडलने बॉयफ्रेंडसोबत वाद झाल्यानंतर फाशी लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मॉडल तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती. जवळपास 12.30 वाजता ही घटना घडली आहे.
दिल्लीहून मुंबईला स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली मॉडल करमजीत उर्फ नेहाने कधी हा विचार ही केला नसेल की जेथे ती भविष्य बनवण्यासाठी आली तेथेच तिला तिचं भविष्य संपवावं लागेल. ज्या मुलासोबत ती मुंबईमध्ये लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती त्याच्यासोबतच वाद झाल्यानंतर तिने आत्महत्या करायचा निर्णय घेतला.
पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. नेहाचं 2012 मध्ये विवाह झाला होता. पण 2 महिन्यात तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर दिल्लीमध्येच नेहाने काम करत स्वत:चा उदरनिर्वाह केला. 6 महिन्याआधीच दिल्लीहून मुंबईला आलेली आणि मॉडलिंगमध्ये स्ट्रगल करत होती. एका पार्टीगरम्यान नेहाची ओळख तिचा बॉयफ्रेंड देवराजसोबत झाली होती.
दोघेही मुंबईमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. देवराज गा देखील सिनेमामध्ये काम करतो आणिआर्ट डायरेक्टर देखील आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावर बनवलेल्या सिनेमामध्ये एका दहशतवाद्याचा रोल देखील याने केला आहे.