20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत

एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

Updated: Nov 21, 2016, 05:58 PM IST
20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत title=

मुंबई : एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं. पण आता 20 वर्षानंतर या गाण्यानं या दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. या गाण्यामुळे गोविंदा आणि शिल्पाला फरार घोषित करण्यात आलं आहे.  

या गाण्यातून बिहारचा अपमान करण्यात आला तसंच अश्लिलता पसरवण्यात आली असा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना 20 जुलैला न्यायालयानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. 18 नोव्हेंबरच्या सुनावणीवेळीही न्यायालयात कोणताच आरोपी हजर राहिला नाही.

यानंतर गोविंदा, शिल्पाबरोबरच गायक उदीत नारायण, अलका याग्निक, अन्नू मलिक, राणी मलिक आणि निर्माता-दिग्दर्शक विमल कुमार यांना झारखडंच्या सीजेएम पाकुड न्यायालयानं फरार घोषित केलं आहे.