सरकार-3चा दुसरा ट्रेलर रिलीज

सरकार-3 चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विटरवरून हा ट्रेलर शेअर केला आहे.

Updated: Apr 27, 2017, 06:09 PM IST
सरकार-3चा दुसरा ट्रेलर रिलीज  title=

मुंबई : सरकार-3 चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विटरवरून हा ट्रेलर शेअर केला आहे. सुभाष नागरेंची भूमिका साकारणारे बिग बी अमिताभ बच्चन या ट्रेलरमध्येही अँग्री लूकमध्ये तर मनोज वाजपेयी भ्रष्टाचारी नेत्याच्या भूमिकेत दिसत आहे.

2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वासारखीच छाप सोडून जाणारा 'सरकार' प्रेक्षकांसमोर आला... त्यानंतर पुन्हा एकदा 2008 साली राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार राज'नंही प्रेक्षकांवर तीच छाप सोडली... दोन्ही 'सरकार'चा एकच आत्मा होता... आणि तो म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन आता 'सरकार 3'मधून तिसऱ्यांदा बीग बी प्रेक्षकांसमोर येत आहेत. या सिनेमात मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, यामी गौतम, रोनित रॉय आणि अमित सध यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.