मग सलमानचंही लवकरच शुभमंगल होणार?

बॉलीवुड स्टार सलमान खानने  आपली बहिण अर्पिताच्या लग्नाचे काही फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत,  ४९ वर्षाच्या सलमानने ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो, नवरदेव आयुष शर्मा आणि वधु अर्पितताच्या विविध मुद्रा शेअर केल्या आहेत.

Updated: Nov 20, 2014, 08:54 PM IST
मग सलमानचंही लवकरच शुभमंगल होणार? title=

मुंबई : बॉलीवुड स्टार सलमान खानने  आपली बहिण अर्पिताच्या लग्नाचे काही फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत,  ४९ वर्षाच्या सलमानने ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो, नवरदेव आयुष शर्मा आणि वधु अर्पितताच्या विविध मुद्रा शेअर केल्या आहेत.

जर लग्नातल्या रिती रिवाजांवर विश्वास ठेवला, तर सलमानचं लवकरच शुभमंगल होणार आहे. कारण एका फोटोत सलमान जमीनीवर झोपला आहे. 

हा एक गंमतीशीर फोटो वाटतो, पण पंजाबी रितीरिवाजात वधुच्या हातात परिवाराचे सदस्य रंगेबिरंगी ‘कलीरे’ बांधतात, जे ‘कलीरे’ फोटोत अर्पिताच्या हातात दिसत आहेत.

हे पंजाबी सहसा लग्नात केलं जातं, आणि असं म्हटलं जातं हे कलीर वधू ज्याच्या अंगावर टाकते त्याचं लवकरच लग्न होतं. अर्पिता हे ‘कलीरे’ सलमानच्या अंगावर पाडण्याचा प्रयत्न करतेय.

अर्पिताचं लग्न हैदराबादेत फलकनुमा पॅलेसमध्ये १८ नोव्हेंबर रोजी पार पडलं, यात सिनेमा जगतातील बड्या हस्ती उपस्थित होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.