T20 World Cup West Indies Vs Papua New Guinea : टी20 वर्ल्ड कप 2024 ला जबरदस्त सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि कॅनडादरम्यानचा सामना जबरदस्त चुरशीचा झाला. तर यजमान वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनी (West Indies Vs Papua New Guinea) दरम्यानचा सामनाही रंगतदार झाला. गयानात झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने पापुआ न्यू गिनीला पाच विकेटने हरवलं. पण नव्या पापुआ न्यू गिनीसमोर वेस्टइंडिजचा हा विजय तितकाच सोपा नव्हता. पापुआ न्यू गिनीच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांच्या नाके नऊ आणले. पापुआ न्यू गिनीने पहिली फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत 136 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान पार करण्यासाठी वेस्ट इंडिजला 19 षटकं लागली. विंडिजने 5 विकेट गमावत 137 धावा करत सामना जिंकला.
पापुआ न्यू गिनीची झुंज
पापुआ न्यू गिनीसाटी सेसे बाऊने शानदार अर्धशतक ठोकलं. त्याने 43 चेंडूत 50 धावा केल्या. टी20 वर्ल्ड कपमध्ये पापुआ न्यू गिनीसाठी अर्धशतक करणारा सेसे बाऊ हा पहिला फलंजाज ठरला आहे. याशिवाय किपलिन डोरिगा 27 आणि असद वालाने 21 धावा केल्या. वेस्टइंडिजसाठी आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फलंदाजी करताना ब्रँडन किंग 34, निकोलस पूरन 27 आणि कर्णधार रोवमन पॉवेलने 15 धावा केल्या. विंडिजची अवस्था 97 धांवर 5 विकेट अशी झाली होती. पण त्यानंतर रोस्टन चेज आणि आंद्रे रसेलने खेळपट्टीवर जम बसवत सामना जिंकून दिला. चेजने 27 धावात 42 तर रसेलने 9 चेंडूत 15 धावा केल्या.
सामन्यात हार्दिक पांड्याची एन्ट्री?
वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनीचा सामना सुरु असताना मैदानात एक अजब घटा घडली ते पाहून सर्वच हैराण झाले. सामना संपल्यानंतर ब्रॉडकास्टर हॉटस्टारने वेस्टइंडिज स्कोर दाखवला. त्यात विंडिजच्या स फलंदाजांच्या जागी भारतीचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फोटो लावण्यात आला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ही गडबड झाल्याचं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलं. पण तोपर्यंत याचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता.
5 जूनला भारताचा पहिला सामना
टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात उपकर्णधार हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात हार्दिकने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या होत्या. यात त्याने 2 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर गोलंदाजी करताना 3 षटकात 30 धावा देत एक विकेट घेतली.