‘डीडीएलजे’चं स्पेशल सेलिब्रेशन कपिलसोबत!

शाहरुख आणि काजोलचा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला सिनेमा म्हणजे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’... १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर आपले एक हजार आठवडे पूर्ण करणार आहे... याचंच सेलिब्रेशन आपल्याला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या सध्याच्या सर्वात चर्चित कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

Updated: Nov 20, 2014, 07:50 PM IST
‘डीडीएलजे’चं स्पेशल सेलिब्रेशन कपिलसोबत! title=

मुंबई : शाहरुख आणि काजोलचा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला सिनेमा म्हणजे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’... १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर आपले एक हजार आठवडे पूर्ण करणार आहे... याचंच सेलिब्रेशन आपल्याला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या सध्याच्या सर्वात चर्चित कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
ऑक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेला शाहरुख खान आणि काजोल यांचा हा चित्रपट आजही मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरवर लागलेला आहे. शाहरुखने चित्रपटाच्या १००० आठवड्यांबाबत शानदार सेलिब्रेशन करण्याची इच्छा दर्शवलीय.
‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ म्हणजेच प्रेक्षकांचा ‘डीडीएलजे’ केवळ ब्लॉकबस्टर ठरलेला सिनेमा नाही... तर मोठ्या पडद्यावर सर्वात जास्त काळ झळकणारा सिनेमा ठरलाय. हा या सिनेमाचा रेकॉर्ड आहे.
एका वर्तमानपत्रातील बातमीनुसार, शाहरुख आणि काजोल हा खास क्षण सेलिब्रेट करण्यासाठी कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईटस्’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. शाहरुख आणि काजोल ३० नोव्हेंबरला या एपिसोडचे शूटिंग करणार असल्याचं समजतंय.
कॉमेडी नाईटस्मध्ये अनेक वेळा सहभागी झालेल्या शाहरुखनं ‘चित्रपटाचा १००० वा आठवडा सेलिब्रेट करण्यासाठी कॉमेडी नाईट हा उत्तम मंच’ असल्याचं म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.