Shweta Tiwari New Look : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करणारी श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी स्वत: ला खूप मेनटेन केलं. त्यामुळे आजही तिच वय कुणाला ओळखता येत नाही. आज जर कोणी श्वेता आणि तिची लेक पलकला पाहिलं तर त्या दोघी बहिणी दिसतात. तर अनेकदा श्वेता ही 16 वर्षांची दिसते असं नेटकरी बोलताना दिसतात. तिच्याकडे पाहिल्यावर तिचं वय झालं असं वाटतं नाही. आता पुन्हा एकदा श्वेताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकं तिची स्तुती करत आहेत.
श्वेता तिवारीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेतानं पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा प्रिंटेड रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. श्वेतानं या को-ऑर्डमध्ये खूप क्लासी अशा पोज दिल्या आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत श्वेतानं कमेवर हात ठेवून पोज दिल्या आहेत. श्वेता तिवारीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'एगदी 16 वर्षांची वाटतेस.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'कधीपर्यंत तरुण राहशील?' तिसरा नेटकरी म्हणाला की 'मॅम तुमच्या इतक्या फिटनेसचं रहस्य काय आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'संतूर मम्मी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'छोट्या पडद्याची फिटनेस क्वीन.'
श्वेता तिवारीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिनं विवेक ओबेरॉयची पत्नी श्रृती बख्शीची भूमिका साकारली होती. सध्या ती कोणत्याही प्रोजेक्टचा भाग नाही. तिनं अनेक छोट्या पडद्यावरील मालिका केल्या आणि रिअॅलीटी शोमध्ये देखील ती दिसली होती.
हेही वाचा : 'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा
श्वेताचं वय आता 43 असून या वयात ती तरुण दिसते. तिच्या लूक्सवर आजही चाहते फिदा असतात. नेहमीच तिच्या फॅशनची आणि त्यासोबत तिच्या लूक्सची चर्चा सुरु असते. नेटकरी नेहमीच तिला तिच्या लूक्सविषयी विचारत असतात. अनेकांना तिचे ब्यूटी सिक्रेट्स हे जाणून घ्यायच आहेत.