'सुल्तान'ची कमाई छप्पर फाडके

अभिनेता सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या 'सुल्तान'ने जोरदार कमाई केली आहे. कमाईचा आकडा वाढतच आहे. बारा दिवसात आतापर्यंत ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

Updated: Jul 19, 2016, 11:07 AM IST
'सुल्तान'ची कमाई छप्पर फाडके title=

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या 'सुल्तान'ने जोरदार कमाई केली आहे. कमाईचा आकडा वाढतच आहे. बारा दिवसात आतापर्यंत ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

सलमान खानचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'सुल्तान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  कमाईत विक्रम केलाय. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढीत 'सुल्तान' सिनेमाने जोरदार कमाई केली आहे. ‘सुल्तान’ चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत तब्बल ५०० कोटींची विक्रमी कमाई केली आहे, ही माहीती यश राज फिल्म्सकडून ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.
 
सुल्तान सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी दाखवण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत नवे विक्रम प्रस्थापित करेल असा अंदाज आहे. सुल्तान' चित्रपटाने फक्त ३ दिवसांत १०५ कोटींची कमाई केली होती. तर पहिल्या दिवशी ३६.५४ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७.३० कोटी तर तिसऱ्या दिवशी ३१.३० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.