बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यावर सलमाननं मौन सोडलं

बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सलमान खाननं मौन सोडलं आहे. 

Updated: Jul 16, 2016, 05:28 PM IST
बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यावर सलमाननं मौन सोडलं  title=

मुंबई : बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सलमान खाननं मौन सोडलं आहे. माझी वक्तव्यं विपर्यास करून दाखवली जातात, याचं मला दु:ख होतं असं सलमान म्हणाला आहे. 

आता मला तुम्हाला अशी गोष्ट दिली पाहिजे जी पुढचे दोन आठवडे चर्चेत राहिल. मी असं काही केलं नाही तर तुम्हाला मी बोर वाटीन, अशी प्रतिक्रिया सलमाननं दिली आहे. मी माझी जबाबदारी समजतो. मी काही बोललो तर माझे प्रशंसक हे पसंत करणार नाहीत, म्हणून तुम्हीच सांगा की तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे, असा प्रश्न सलमाननं पत्रकारांना विचारला. मी काही बोललो नाही तरीदेखील माझ्याबद्दल लिहीलं जाईल, असंही सलमान म्हणाला आहे.  

सुल्तानच्या शूटिंगमुळे मी खूप दमायचो. शूटिंग संपल्यावर मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं असं वक्तव्य सलमाननं केलं होतं.