सलमान, जॅकलीन आणि पहाटे तीन वाजता मैत्री...!

सलमान खानला समजू शकणं खरंच खूप कठीण आहे. खासकरून तेव्हा जेव्हा प्रकरण त्याचा फ्रेंड, स्पेशल फ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं असेल. काही दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजता सलमान आपल्या एका मित्राकडे अचानक पोहोचला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची ‘किक’मधील सहकलाकार आणि श्रीलंकेची सुंदरी जॅकलीन फर्नांडिस होती.

Updated: Sep 9, 2014, 10:16 AM IST
सलमान, जॅकलीन आणि पहाटे तीन वाजता मैत्री...! title=

मुंबई: सलमान खानला समजू शकणं खरंच खूप कठीण आहे. खासकरून तेव्हा जेव्हा प्रकरण त्याचा फ्रेंड, स्पेशल फ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं असेल. काही दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजता सलमान आपल्या एका मित्राकडे अचानक पोहोचला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची ‘किक’मधील सहकलाकार आणि श्रीलंकेची सुंदरी जॅकलीन फर्नांडिस होती.

सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणून बाजारात चर्चेत असतो. किकच्या शूटिंगपासूनच सल्लूमियाँ आणि जॅकलीनबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र चर्चा आणखी रंगली जेव्हा जाहीरपणे सलमानं जॅकलीनच्या सौंदर्याची स्तुती केली. एवढंच नव्हे तर “सलमाननं आतापर्यंत मोठ्या पडद्यावर किस केलं नाहीय, जर कोणाला किस करायचं असेल तर मी जॅकलीनला करेल”, असं सलमानं म्हटलंय.  

काय घडलं त्या पहाटे...

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, काही दिवसांपूर्वी सलमान खाननं अचानक एक प्लान बनवला आणि रात्री तीन वाजता आपल्या मित्राकडे पोहोचला. सलमानचं अशाप्रकारे रात्री-अपरात्री मित्रांकडे जाणं सामान्य आहे. मात्र यावेळी त्याच्यासोबत जॅकलीन होती. सांगण्यात येतंय की, जॅकलीनला पाहून सलमानच्या मित्रालाही आश्चर्य वाटलं होतं. 

48 वर्षीय सलमान, 29 वर्षाची जॅलकीन

सलमान आणि जॅकलीनची स्पेशल केमेस्ट्री किकच्या प्रमोशन दरम्यानही मीडियामध्ये समोर आली होती. एका इव्हेंट दरम्यान जॅकलीननं सलमानला किस केलं होतं, तेव्हा सलमाननं जॅकलीनची तुलना झिनत अमानसोबत केली होती. एवढचं नव्हे तर सलमाननं जॅकलीनला जेएफके (जॅकलीन फर्नांडिस खान) सुद्धा म्हटलं. 

या दरम्यान बातमी अशीही आली की, सलमाननं जॅकलीनला फ्लॅट गिफ्ट केलाय. अजून या बातमीवर शिक्कामोर्तब झालं नाहीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.