मुंबई : प्रियंका चोपडाचा अभिनय असलेल्या आणि पाच वेळेस जागतिक विजेता ठरलेल्या महिला बॉक्सर मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या मेरी कॉम चित्रपटाने दोन दिवसांच्या आत 17 कोटी 25 लाखांची कमाई केली आहे.
पुरूष हेच चित्रपटाचे हिरो असतात, हा समज या चित्रपटाने मोडून काढला आहे. जर पटकथेत दम असेल तर महिलांवर आधारीत चित्रपटही जोरदार प्रदर्शन करू शकतात, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
मेरी कॉम या चित्रपटाला शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आलं, देशभरातील १८०० पेक्षा जास्त सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज करण्यात आला. प्रियंकाचा सर्वोत्कृष्ट अभिनय ही जमेची बाजू मानली जातेय.
उमंग कुमार यांचा हा सिनेमा आहे, हा सिनेमा मेरी कॉमच्या जीवनावर आधारीत आहे, या स्टोरीत बदल करता आला असता. पण मेरी कॉम यांच्या जवळ हा सिनेमा जावा, हाच प्रयत्न असल्याचं उमंग यांनी म्हटलंय.
टीकाकारांनी हा चित्रपट नाकारला होता, पण आता हा चित्रपट सफल झाल्याचं चित्र आहे. उमंग कुमार यांनी प्रेक्षकांना धन्यवाद दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.