लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्...

Junaid Khan on Brother in Law Nupur Shikhare : जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  

दिक्षा पाटील | Updated: Jan 26, 2025, 03:01 PM IST
लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्...  title=
(Photo Credit : Social Media)

Junaid Khan on Brother in Law Nupur Shikhare : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'लवयापा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरंतर, थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिला चित्रपट आहे. या सगळ्यात तो सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका मुलाखतीत जुनैदनं त्याची बहीण आयराचा नवरा लग्नाच्या आधल्या रात्री पूर्णवेळ त्याच्यासोबत होता याचा खुलासा त्यानं केला आहे. 

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खाननं आयरासोबत असलेल्या ट्रेडिशन्सविषयी सांगितलं. जुनैदच्या म्हणण्याप्रमाणे 'त्याचा एक रूल आहे. त्याच्या बहिणीला जो डेट करतो त्याला खूप सोपी गोष्ट करायची आहे. त्या मुलाला घरी यायचं आहे आणि त्याच्यासोबत ड्रिंकिंग कॉन्टेस्ट करायचं आहे. खेळाचा एकच नियम आहे की दारू हातात घ्यायची आणि 15 मिनिटात शॉट घ्या आणि जर तो या खेळात टिकू शकला नाही तर तो हरला. या खेळात त्यानं जर जुनैदला हरवलं तर सगळं ठीक आहे. त्या मागचं कारण सांगत जुनैदनं सांगितलं की आयराला कळायला हवं की तिचा जो पार्टनर आहे तो त्याच्या सगळ्यात वाईट परिस्थितीत किती चांगला वागतो. जुनैदनं पुढे मस्करीत सांगितलं की त्याला असं जास्त कधी करावं लागलं नाही.'  

हेही वाचा : बाबोओ... फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी 'या' अभिनेत्याने विकत घेतलाय 3 BHK फ्लॅट

आयराचा नवरा नुपुरसोबत ड्रिंकिंग कॉन्टेस्टला घेऊन सांगितलं की एक वेळ अशी होती की त्याची कपॅसिटी ही संपली होती. मात्र, जुनैदनं नुपूर किती प्रगल्भ आहे हे पाहिलं आणि त्यामुळे शेवटचा शॉट हा नुपुरला घेऊ दिला आणि त्याला जिंकू दिलं. आयरानं या मुव्हमेंटला कॅप्चर देखील केलं असून ते खूप स्वीट आहे. ती रात्र तिथेच थांबली नाही. नुपुरनं त्यानंतर संपूर्ण रात्र ही बाथरुमच्या फ्लोअरवर काढली आणि आयरा त्याच्यासोबत होती. त्यानंतर मी त्यांना उचललं आणि मग बेडवर झोपवलं. त्यानंतर संपूर्ण रात्र तो मला मिठी मारत होता.