सलमानला जेल की बेल?

सेशन कोर्टाकडून सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल. 

Updated: May 7, 2015, 11:21 PM IST
सलमानला जेल की बेल? title=

मुंबई : सेशन कोर्टाकडून सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल. 

याचबरोबर सलमान खानला रेग्युलर जामीन मिळणार की त्याला जेलमध्ये जावं लागणार? हेदेखील स्पष्ट होईल. अनेक कायदेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सलमानला रेग्युलर जामीन मिळण्यात अडचण येणार नाही. मात्र, तरीही हाय कोर्टाचा आदेश येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. 

सलमान खानने साडेबारा वर्ष प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढली. या लढाईत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानं त्याची हार झाली. आता सलमान 'राऊंड टू'साठी तयार आहे. ही लढाई असणार आहे मुंबई उच्च न्यायालयात... आता सलमान खान सेशन कोर्टाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेला हाय कोर्टात आव्हान देईल. मात्र एखाद्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्यासाठी चांगलीच तयारी करावी लागते आणि वेळही लागतो. आता सलमान खानला देण्यात आलेल्या दोन दिवसांच्या जामीनाला रेग्युलर जामीन म्हणून बदलण्याचं आव्हान सर्वात प्रथम सलामनच्या वकिलांसमोर असेल. 

कायदेतज्ज्ञांच्या मते सलमानला रेग्युलर जामीन मिळण्यात काहीही अडचण येणार नाही. कारण गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ सलमान जामीनावरच आहे आणि तो पलायन करण्याचा धोकाही नाही. कायद्यामध्ये हे नियम आहेत. मात्र, सलमानला रेग्युलर जामीन मिळेलच याची शाश्वतीही देता येत नसल्यानं सलमान जेलमध्येही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

याबाबत एका जुन्या प्रकरणाचं उदाहरण दिलं जातं. महाराष्ट्र सरकार विरुद्ध चंद्रप्रकाश नेशवडेव 1991 Cr.L.J.3187 या केसच्या निकालात म्हटलं होतं की,
याप्रकारची पब्लिक पॉलिसी खूप आवश्यक आहे की ज्या आरोपीने गुन्हा केला आहे. त्याला तेव्हाच शिक्षा झाली पाहिजे जेव्हा ते प्रकरण लोकांच्या मनात ताजं असेल. जर कोणत्याही कारणामुळे न्याय प्रक्रियेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक उशीर झाला असेल आणि या परिस्थितीत आरोपीच्या विरोधात निकाल आला असेल तर त्या आरोपीला जेलमध्ये पाठवणं अन्याय ठरणार नाही. मग भले आरोपीने कितीही गंभीर गुन्हा केलेला असो... हा निकाल खुप काही सांगून जातो...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.