मोदींना आणखी वेळ द्यायला हवा- सलमान खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनं उभा राहिलाय. “नरेंद्र मोदींना कामासाठी आणखी वेळ द्यायला हवा, अवघ्या १०० दिवसांवरून त्यांना जज करू नये”, असं सलमान म्हणाला. 

Updated: Sep 16, 2014, 07:37 AM IST
मोदींना आणखी वेळ द्यायला हवा- सलमान खान title=

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनं उभा राहिलाय. “नरेंद्र मोदींना कामासाठी आणखी वेळ द्यायला हवा, अवघ्या १०० दिवसांवरून त्यांना जज करू नये”, असं सलमान म्हणाला. 

एका टिव्ही चॅनेलशी बोलतांना सलमाननं जी लोकं मोदींवर त्यांच्या १०० दिवसांच्या कामाबद्दल टीका करतायेत, त्यांना फटकारलंय. सलमान म्हणाला, “लोकांना स्वत: जबाबदारी घ्यायला जमत नाही. पंतप्रधान मोदी सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या सहकाऱ्यांबरोबर सतत काम करत असतात. देशासमोर अनेक आव्हाने आणि अडथळे आहेत.”

सलमान पुढे असंही म्हणाला की, मोदींना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यावं. पंतप्रधानांनी पाकिस्तानी पूरग्रस्तांना देऊ केलेल्या मदतीबद्दलही सलमाननं त्यांचं कौतुक केलंय.  

सलमान खान मोदींच्या शपथविधीसाठी निमंत्रीत होता. तसंच त्यानं आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना गुजरातला जावून त्यांची भेट घेतली होती. गुजरातच्या काईट फेस्टिव्हलला सलमान मोदींसोबत सहभागी झाला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.