मुंबई: बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार कुणाशी लग्न करणार याविषयी अनेक कयास लावले जातात. कुणी सांगतं की सलमान खान आता लग्न करणार नाही, आणि जेव्हा सलमानला विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो, मलाच माहित नाही, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल.
बिग बॉस सीझन ८मध्ये रविवारी प्रसारीत करण्यात आलेल्या एका शोमध्ये सलमानने रेखाला बोलावलं होतं, या दरम्यान त्यांनी एकमेकांची गंमत केली, बोलण्याबोलण्यात सलमानला रेखा म्हणाली, तू माझं ऐकून घे, लग्न कर लवकर, शोमध्ये सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यावर रेखा म्हणाली, मला माहित आहे, सलमान का लग्न करत नाहीय.
का करत नाहीय सलमान लग्न?
यावर रेखा म्हणते, जेव्हा सलमान चार ते पाच वर्षांची होती आणि रेखा सकाळी-सकाळी बांद्राहून मॉर्निंग वाकला जात होते, तेव्हा सलमानबाबा माझ्या मागे मागे फिरायला येत होता, तेव्हा सलमानचं वय सात ते आठ वर्ष असेल.
घरी परतल्यानंतर सलमान आईला सांगत असे, की मोठा झाल्यावर तो माझ्याशी लग्न करणार आहे. हे ऐकून सलमान आतापर्यंत लग्न करू शकला नाही, हे ऐकून सलमानचा चेहरा लाजीरवाणा झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.