मुंबई : आतापर्यंत कोणतीही भूमिका करणाऱ्या अभिनेत्री आपण त्या भूमिकेशी रिलेट करतो असे सांगतात. पण 'बाजीराव मस्तानी'मध्ये काशीबाईची भूमिका करणारी प्रियंकाने आपण काशीबाईशी रिलेट करत नसल्याचे सांगितले आहे.
'बाजीराव मस्तानी' चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्यांदा प्रियंका अमेरिकेतील शुटिंग संपवून भारतात आली, त्यावेळी तिचे कौतुक करणारे अनेक फोन तिला आले. या चित्रपटातील तिची भूमिका सर्वांना आवडली. प्रियंकाने ही भूमिका लीलया पार पाडली तरी ती या भूमिकेशी आणि त्या पात्राशी बिलकूल सहमत नाही.
'मी घरी पोहचली तेव्हा माझा वाढदिवस आहे, असे माझे स्वागत झाले. चित्रपट रिलीज होत असताना मी अमेरिकेतून परत येत होती. मी लँड करत असताना माझा फोन सतत खणखणत होता. मला माहिती होते की काशीची भूमिका खूप छान होती. मी या भूमिकेसाठी सर्वात पहिले कास्ट करण्यात आली आहे.
या चित्रपटात मी काशीबाईची भूमिका केली आहे, तरी मी तिने जो पर्याय निवडला तो मला व्यक्तीशः मान्य नाही. एक महिला म्हणून विचार केला तर माझ्या नवऱ्याने मला फसवलं असतं त्यावेळी त्याला म्हटलं असतं थॅक्यू वेरी मच, गुड बाय... मी यातून बाहेर पडते. काशीनेही आपल्या पद्धतीने असेच केले आहे. ती म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते, तू आनंदी राहावा असे वाटते. तू तिच्या सोबत आनंदी आहेस, माझ्या दरवाज्यावर पुन्हा येऊ नको. असे करण्यासही त्यावेळी धाडस लागते.
बाजीराव मस्तानीमुळे कोणालाही काशीबाई माहित नव्हती, पण संजय लीला भंसाळी यांनी काशीबाईलाही प्रकाशात आणले.