आता बाजीराव-मस्तानी एकत्र येणार

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या चाहत्यंसाठी ही खुशखबर आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रणवीर आणि दीपिका पुढील वर्षी त्यांच्या नात्यांला सर्वांसमक्ष स्वीकारणार आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडूनही परवानगी मिळालीये.

Updated: Dec 28, 2015, 12:58 PM IST
आता बाजीराव-मस्तानी एकत्र येणार title=

मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या चाहत्यंसाठी ही खुशखबर आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रणवीर आणि दीपिका पुढील वर्षी त्यांच्या नात्यांला सर्वांसमक्ष स्वीकारणार आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडूनही परवानगी मिळालीये.

गेल्या दोन वर्षांपासून रणवीर आणि दीपिका डेट करत आहेत. बाजीराव-मस्तानीच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान दोघांमधील समजूतदारपणा आणि केमिस्ट्री पाहायला मिळाली. मात्र अद्याप या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिका दोघेही कुटुंबाच्या मताला पहिली पसंती देतात. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय ते नात्यात पुढे जाऊ शकत नाहीत. आता दोन्ही कुटुंबानी या नात्याला परवानगी दिलीये. त्यामुळे नात्याला पुढे नेण्यास हे दोघेही तयार आहेत. त्यामुळे पुढचे वर्ष रणवीर आणि दिपीकासाठी खास असणार हे नक्की.