ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला कालवश

 ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शुकंतला यांचं एका खासगी वृद्धापकाळानं निधन झालं, बेबी शकुंतला हा ८२ वर्षांच्या होत्या. बेबी शकुंतला यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत.

Updated: Jan 18, 2015, 04:30 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला कालवश title=

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शुकंतला यांचं एका खासगी वृद्धापकाळानं निधन झालं, बेबी शकुंतला हा ८२ वर्षांच्या होत्या. बेबी शकुंतला यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत.

उमादेवी, या बेबी शकुंतला या नावानेच ओळखल्या गेल्या, त्यांनी त्यांच्या अभिनयाला सुरूवात बालपणापासून केली होती. दहा वाजता या प्रभात फिल्म कंपनी निर्मित चित्रपटात त्यांनी सहाव्या वर्षापासून अभिनयाला सुरूवात केली.

बेबी शकुंतला यांनी या नंतर ६० मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं, शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंतर माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी.आर.चोप्रा यांच्या समवेत काम केलं.

शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला, त्यांचे वडिल एका प्रिटिंग प्रेसमध्ये कामाला होते. ती एक मध्यमवर्गीय परिवारातून चित्रपट सृष्टीत आली.

प्रभात स्टुडिओच्या दामले यांनी तिच्या पालकांना अभिनयाविषयी विचारलं त्यांना चित्रपटात एक बाल कलाकार हवी होती.

प्रभात निर्मित मराठी चित्रपटांमध्ये शकुंतला यांनी १९४४ पासून प्रभावी अभिनयास सुरूवात केली, यात रामशास्त्री, शारदा, चिमणी पाखरे, अबोली, माया बाजार या चित्रपटांचा समावेश आहे.

शकुंतला यांनी ४० हिंदी चित्रपटातही अभिनयाची छाप सोडली आहे. पीएस अरोरा यांचा परदेस, नन्हे मुन्ने आणि लहरे चित्रपटाचा त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.