सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज झालं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चष्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Updated: Jul 27, 2016, 05:21 PM IST
सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चं पहिलं गाण रिलीज झालं आहे. गेले काही दिवस चित्रपटातील 'काला चष्मा' गाण्याचं जोरदार प्रमोशन करण्यात येत होतं. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

रॅपर बादशाहने ‘काला चष्मा’ गाण्यास संगीतबद्ध केले असून १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चष्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी हे गाणं गायलं आहे. बॉस्को-सिझर यांनी कोरिओग्राफी केली आहे. या गाण्यात सिध्दार्थ आणि कॅटची सिझलिंग केमिस्ट्री बघायला मिळणार आहे..

पाहा व्हिडिओ