मुंबई : 'बिग बॉस'च्या निमित्तानं सलमान खान छोट्या पडद्यावर दाखल झाला... आणि छोट्या पडद्याचे सगळेच प्रेक्षक हा दबंग खान आपल्याकडे ओढणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
पण, छोट्या पडद्यावरही सलमानच 'दबंग' ठरणार असा अनेकांचा विश्वास चुकीचा ठरलाय... कारण, सलमानला लोकप्रियतेच्या बाबतीत मात दिलीय ती दुसऱ्याच एका छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या अँकरनं... आणि हा अँकर म्हणजे कपिल शर्मा
'ऑरमॅक्स इंडिया'नं जानेवारी महिन्यात केलेल्या 'कॅरॅक्टर्स इंडिया लव्ह' या सर्व्हेनुसार, कपिल शर्मा यानं सगळ्यात जास्त प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं समोर आलंय. कपिलच्या लोकप्रियतेनं सलमान खानच्या लोकप्रियतेलाही मात दिलीय.
यामध्ये, १४ शहरांतल्या जवळपास ३५०० लोकांनी आपली मतं नोंदवलीत. या सर्व्हेत दुसऱ्या नंबरवर होता तो सलमान खान आणि तिसऱ्या नंबर होता 'बिग बॉस ९'चा विजेता प्रिन्स नरुला... तर 'गुत्थी' म्हणजेच सुनील ग्रोव्हर आणि 'बिग बॉस ९'फेम मंदना करिमीनंही या सर्व्हेत अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला.