'फितूर'मधल्या या आठ चुका तुमच्या लक्षात आल्या का?

तब्बू, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'फितूर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. व्हॅलेंटाईन विकच्या मुहूर्तावर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अजूनही कायम आहे. 

Updated: Feb 13, 2016, 04:45 PM IST
'फितूर'मधल्या या आठ चुका तुमच्या लक्षात आल्या का? title=

मुंबई : तब्बू, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांचा 'फितूर' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. व्हॅलेंटाईन विकच्या मुहूर्तावर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता अजूनही कायम आहे. 

तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर अनेक गोष्टी तुम्हाला खटकल्या असतील किंवा नसतील... पण, सिनेमात अशा अनेक चुका आहेत ज्या दिग्दर्शक अभिषेक कपूर याच्या नजरेतून सुटल्यात... सिनेमा सुंदर बनवण्याच्या नादात या सिनेमाच्या इतर गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष झालेलं दिसतंय.  

कतरिनाचे लाल केस

कतरिनाचे केस लाल रंगाचे करण्यासाठी तब्बल ५० लाख खर्च करण्यात आले होते, हे तर एव्हाना तुम्हाला ठावूक झालंच असेल... पण, लहान कतरिनाचे मात्र केस सिनेमात काळेभोर दिसतात... मोठ्या कतरिनाच्या लालेलाल केसांकडे तुमचं लक्ष नक्कीच वेधलं असेल... तब्बूचेही संपूर्ण सिनेमात लाल केस दिसतात... पण, छोट्या कतरिनाचे नाही... 

आदित्यचं लेदर जॅकेट

आदित्य रॉय कपूर या सिनेमात एवढा गरीब मुलगा दाखवला गेलाय... की त्याला फाटलेले शूज घालावे लागत आहेत. त्याला स्कॉलरशिप मिळाल्यानंतर जेव्हा तो काश्मीरमधून निघताना दाखवला गेलाय तेव्हा मात्र तो लेदर जॅकेटमध्ये बाहेर पडतो.

जॅकेटच्या ऐवजी स्वेटर

काश्मीरहून निघालेला 'नूर' म्हणजेच आदित्य दिल्लीत पोहचतो... दिल्लीचं गर्मीचं वातावरण तुम्हालाही ठावूकच असेल.. आदित्यलाही हे जाणवलेलं दिसतंय. कारण, काश्मीरहून लेदर जॅकेटमध्ये निघालेला आदित्य दिल्लीत मात्र स्वेटर घातलेला दिसतो.

कतरिनाचा अॅक्सेंट

कतरिनाची हिंदी तर तुम्हाला माहितीच आहे... पण, या सिनेमात ती अनेकदा टिपिकल इंग्रजीत बोलताना पाहायला मिळते... आणि तिचं हे इंग्रजीही कधी ब्रिटीश अॅक्सेंटमध्ये आहे तर कधी यूएस... 

कतरिनाचं उर्दू

जेव्हा कतरिना आदित्यसाठी एक पत्र लिहून निघून जाते... तेव्हा तिनं हे पत्र उर्दूत लिहिलेलं दाखवलं गेलंय... पण, त्यातील शब्द मात्र उर्दू नाहीत... मग, हिंदी किंवा इंग्रजीतही हे पत्र लिहिलं असतं तरी काही प्रॉब्लेम नसता.

हिंदू - उर्दूची गफलत

अभिषेक कपूर यांनी सिनेमातील अनेक गोष्टींवर चांगलं लक्ष दिलेलं असलं तरी सिनेमाच्या डायलॉगमध्ये मात्र ते हिंदी-उर्दूशी संघर्ष करताना दिसतात. 

आदितीचा आवाज

सिनेमात छोट्या तब्बूच्या भूमिकेत अदिती राव हैदरी दिसते... परंतु, अदितीचाही आवाज तब्बूनच दिलाय... आणि हे तुमच्या सहजच लक्षात येईल. 

आदित्यचा कुत्रा

एका कुत्र्याचं आयुष्यमान किती असतं याचा अंदाजा तुम्हाला असेलच... नसेल तर एकदा गुगल करून पाहा... छोटे आदित्य - कतरिना जेव्हा एकमेकांपासून दूरावतात तेव्हा त्यांच्याजवळ एक कुत्रा घुटमळताना दिसतो... हे दोघे १६ वर्षांनंतर भेटतात तेव्हाही हाच कुत्रा तुम्हाला सिनेमात दिसतो.